देवरुख होम प्रॉडक्ट्स प्रा.लि. कंपनीला सांगायला भरपुर आनंद होत आहे की, गेल्यावर्षी म्हणजे सन २०२३ मध्ये कंपनीने गणेशोत्सव निमित्त काजू मोदक या नवीन उत्पादनाची चाचणी (ट्रायल) घेतली आणि विक्रीसाठी बाजारात आणले आणि या प्रॉडक्टला ग्राहकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. काजू मोदकला मागणी खुप आली पण आम्ही ती पूर्ण करु शकलो नाही. इतका चांगला प्रतिसाद तसेच ग्राहकांच्या भरगोस प्रतिक्रिया आल्या त्यामुळे कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा उत्साह द्विगुणीत झाला.
मागील वर्षीच्या ग्राहकांच्या उत्तम प्रतिसादामुळे यावर्षी म्हणजे सन २०२४ च्या गणेशोत्सवाला पुन्हा त्याच उत्साहात आणि जोशात कंपनीने साजूक तुपातील उत्कृष्ट अशा काजू मोदकांचे उत्पादन केले सोबतच भाजणी चकली, लाडू, चिवडा व इतर उत्पादने होतीच. मागील वर्षीची काजू मोदकची मागणी बघता यावर्षी आधीच सर्व नियोजन करून सर्वांची मागणी कशी पूर्ण करता येईल यावर कंपनीच्या कर्मचारी वर्गाने तसेच बचत गटातील महिलांनी खुप मेहनत घेतली. गणेशोत्सवाच्या १५ दिवासांच्या आधीपासूनच काजू मोदकची ऑर्डर बुकिंग सुरु झाले होते. याचे सर्व श्रेय्य अतिशय मेहनतीने काम करणारे कंपनीचे कर्मचारी व अर्थातच उत्तम ग्राहक वर्ग यांना देणे महत्वाचे वाटते.
यंदाच्या गणेशोत्सवामध्ये कंपनीने काजू मोदक, चकली, लाडू तसेच इतर उत्पादने मिळून मागील वर्षीपेक्षा तीन पटीने विक्री करुन या फक्त १५ दिवसांत काही हजारोंचा नफा मिळवला आहे. तसेच यातुन मिळणाऱ्या रोजगारामुळे ५ महिलांना रु. १४,०००/- ते १५,०००/- एवढी आर्थिक मदत झाली.
देवरुख होम प्रॉडक्टस् प्रा.लि. कंपनी आपल्या दर्जेदार आणि उत्कृष्ट उत्पादनांकरिता कायम प्रसिध्द आहे. मुंबई, ठाणे, पूणे, केरळ, गुजरात, बेंगलोर, चेन्नई इ. ठिकाणी आपल्या उत्पादनांना या वर्षभरामध्ये चांगली मागणी आली आणि ती कंपनीने पूर्ण केली आहे.
कंपनीच्या सर्व ग्राहकांचे प्रेम आणि विश्वास देवरुख होम प्रॉडक्ट्स प्रा. लि. कंपनीला नवीन उर्जा देऊन जातात. त्यामुळे सर्वांचे कंपनीने मनःपूर्वक आभार मानले आहेत, आणि आता कंपनीतील कर्मचारी व महिला यंदाच्या दिवाळीच्या तयारीसाठी अतिशय आत्मविश्वासाने आणि स्फुर्तीने सज्ज झाले आहेत.