शैक्षणिक प्रकल्प
शिक्षणाचे महत्व सर्वाना कळू लागलं , प्राथमिक शिक्षण मोफत ,माध्यमिक शिक्षण ही बऱ्याच अंशी मोफत ,तरीही काही मुले -मुली शाळेत जाऊ शकत नाहीत,जात नाहीत अशी स्थिती होती ,विशेषतः मुलींना जास्त नको शिकवायला ही धारणा अनेक कारणांनी ,अनेक कुटुंबात जाणवत होती, म्हणून या मुलांना काही झालं तरी शिक्षण घ्यायला भाग पडायचं अस आम्ही ठरवलं
स्नेहसमृद्धी संस्थेच्या समपर्कातील गावांमध्ये ,जवळ जवळ सर्वच घराघरात आम्ही जाऊन पोचलो होतो ,त्या कुटुंबाशी आमचा आपुलकीचा सम्बध दृढ झाला होता त्या मूळे अगदी गरीब कुटुंबातील अडचणी आम्ही समजू शकत होतो ,अशा कुटुंबाला आपल्याला मदत करायलाच हवी हे पटलं होत
दुसरं म्हणजे संस्कारक्षम वयात मुलांना योग्य अयोग्य काय ,स्वतःच्या कलागुणांचा ओळख होणं,आपली जबाबदारी समजून घेणं ,आपल्या भवितव्यासाठी आपणही कसा विचार करायला पाहिजे अशा महत्वाच्या गोष्टी साठी आपल्याला या मुलांना बरोबर घ्यायला हवं हे आम्ही आमच्या या सामाजिक प्रक्रियेत समजलो
तिसरा आमचा हेतू व्यक्ती ,कुटुंब व समाज या सर्वांचा विकास म्हणजे आपल्या देशाच्या प्रगतीचा महत्वाचा भाग आहे
या सर्व गोष्टी विचारात घेऊन शैक्षणिक प्रकल्प सुरू झाला



