या दोन्ही विभूती सामाजिक क्षेत्रातील उच्चशिक्षित व 33 वर्षाहून अधिक काळाचा प्रत्यक्ष सामाजिक कार्याचा अनुभव गाठीशी असलेलं हे जोडपं, त्यांच्या मार्गदर्शनाचा रत्नागिरी जिल्ह्यातिल संस्थाना व्हावा या उद्देशानी संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले.
स्नेह समृद्धी मंडळ संस्था ज्या महिला समूहानंबरोबर कार्य करीत आहे , त्या महिलांना मुलींच्या लैंगिक शिक्षणा बद्दल , स्त्रिया व मुले यांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाला प्रतिबंध करणे, त्या बाबत कायदे , समिती व कार्यपद्धती बाबत, प्रशिक्षण देण्याची तयारी दाखवली आहे. या वेळी सविस्तर चर्चा करण्यासाठी या दोघांबरोबरच स्नेह सम्रुद्धी मंडळ संस्थेचे मार्गदर्शक व विश्वस्त श्री.राम देशपांडे आणि सर्व कार्यवाहू कार्यकर्ते या भेटीदरम्यान उपस्थित होते.
परिवर्तन संस्थेच्यावतीने देखील सुरु असणाऱ्या मुलींच्या विशेष ट्रेनिंग बाबत चर्चा झाली.
संस्थेला खूप मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन झाले , असेच मार्गदर्शन आपल्या दोघांकडून नेहमी मिळावे .
स्नेह समृद्धी मंडळ संस्थेच्या वतीने आपल्या दोघांचे मनापासून धन्यवाद !