महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहोचणे शक्य होत नाही. महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरीता “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमाद्वारे सुनावणीचे नियोजन दि. १८/१२/२०२४ रोजी कलेक्टर ऑफिस, रत्नागिरी या ठिकाणी करण्यात आले होते. सदर जनसुनावणीस मा. अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या. तक्रारदार पिडीत महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी, कोणतीही पिडीत महिला कोणतीही पूर्व सूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली लेखी समस्या आयोगापुढे मांडू शकणार होती. सदर सुनावणीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पोलीस विभाग, समुपदेशन केंद्र यांचेकडून तात्काळ सेवा उपलब्ध करुन जिल्हयातील महिलांनी आपल्या समस्या मांडाव्यात यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत स्थानिक माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडून कळविण्यात आले होते.
संस्थेचा समुपदेशनाचा कल आपल्याकडे दाखल होणाऱ्या केसेसचा योग्य निवाडा कसा होईल याकडे असते, परिणामी अनेक केसेस कोर्टापर्यंत जाणे, निकाल प्रलंबित राहणे हे फारसे होत नाहीत. पण शसनाकडून केलेल्या सुचनेनुसार आपल्याला किमान १० केसेस देणे अपेक्षित होते. त्यामुळे आपल्याला ३ केसेस अदालत मध्ये ठेवता आल्या. संस्थेच्या सहाय्यक समुपदेशक व जेष्ठ कार्यकर्त्या सुनिता माईन यांनी त्या ठिकाणी योग्य पध्दतीने भूमिका घेऊन, योग्य मांडणी करण्यासाठी प्रयत्न केले. तिनही केसेस योग्य पध्दतीने त्याठिकाणी बोलल्या. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. रुपाली चाकणकर यांनी योग्य दखल घेतली. पुढील पाठपुरावा समुपदेशन केंद्राच्या वतीने माईन बाई करतीलच.
अशा प्रकारे “महिला आयोग आपल्या दारी” या कार्यक्रमात संस्था सहभागी झाली. शासनाच्या कडून उत्तम सहकार्य झाले. संस्थेला आपण करीत असलेले कार्य हे योग्य दिशेने होतेय याबद्दल समाधान वाटले, हे पुढील कामाला अधिक प्रेरणादायी ठरेल.