स्नेह समृद्धी मंडळ संस्था नेहमी आपल्या प्रगतीच्या दृष्टीने प्रयत्नशील असते. त्यासाठी सतत जागृत राहून संस्थेचे ट्रस्टी प्रयत्न करित असातात. तसेच संस्थेच्या प्रतिनिधींचा सहभाग विविध स्तरांवरील सामाजिक संस्थाच्या उपक्रमांमध्ये नेहमीच असतो.
यातीलच एक भाग म्हणून पुणे येथे झालेल्या सेवावर्धिनी या सामाजिक संस्थेच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त 2 दिवसाच्या परिषदेसाठी स्नेह समृद्धी मंडळाने सहभाग घेतला.
सेवावर्धिनी सारख्या संस्था सामाजिक क्षेत्रात काम करणा लहान-लहान संस्थाच्या बळकटीकरणासाठी नेहमीच सहकार्य करित असते त्यांच्या विविध स्तरांवरील केलेल्या सामाजिक कार्याच्या उंचीची इथे प्रचिती बघायला मिळाली.या दोन दिवसीय परिषदेमध्ये दैदीप्यपूर्ण विषयांची माहिती मिळाली. समाजातल्या अतिशय वंचित घटकांच्या उन्नतीसाठी या संस्थेने उल्लेखनीय असे केलेले काम अनुभवास मिळाले.
या परिषदेने विविध संस्थाची त्यांनी केलेल्या व करीत असलेल्या कार्याची माहिती मिळाली.तसेच पाणी व्यवस्थापन , सामाजिक माध्यमे व माध्यमांचा प्रभावी वापर, संस्था कार्यकर्ते व्यवस्थापन,हिशेब व्यवस्थापन, तसेच विविध संस्थांनी बनवलेल्या उत्पादनाचे माहितीचे प्रदर्शन यांचा या परिषदेमध्ये सामावेश होता. सुमारे 350 संस्थानी यामध्ये सहभाग घेतला होता.
या परिषदेमध्ये स्नेह समृद्धी मंडळ संस्थेच्या अध्यक्षा – सौ.श्रद्धा देशपांडे आणि महिला समन्व्यक – सौ. नयन शिंदे उपस्थित होते.