संस्थेने शालेय विद्यार्थी या घटकावर लक्ष केंद्रीत करुन त्यांच्या शिक्षणासाठी, व्यक्तीमत्व विकासासाठी आणि पर्यायाने एक चांगला नागरिक, आचार विचाराने सुदृढ कुटुंब व पर्यायाने समाज घडण्याच्या दृष्टिने काम करायला सुरुवात केली. त्यासाठी ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील होतकरु विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत करण्याचे काम सुरु आहे. सन २०१७/१८ ते २०२३/२४ पर्यंत एकूण ३४४ गरजु विद्यार्थ्यांना याचा चांगल्या प्रकारे उपयोग झाला आहे. त्यांच्या कुटुंबाला यामुळे हातभार लागला आहे आणि विद्यार्थ्यांनीही अतिशय चांगली प्रगती केली आहे.
कार्यक्षेत्रातील वाशी तर्फे संगमेश्वर या हायस्कुलमध्ये १६ ऑगस्ट २०२४ रोजी शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शिक्षक, शासनाचे प्रतिनिधी, उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती विद्यमान आमदार मा. शेखरजी निकम साहेब, संगमेश्वर चिपळूण विधानसभा सदस्य यांची होती. संस्थेने वाशी तर्फे संगमेश्वर शाळेतील १३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत केली आहे. याबद्दल विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थांच्या वतीने संस्थेचे आभार मानण्यात आले. यावेळी मा. शेखरजी निकम साहेब यांच्या हस्ते संस्थेचा गौरव करण्यात आला. कार्यकर्ते नयन शिंदे व वैभव गवंडी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते.