संस्थेने १२ ते २० वयोगटातील ( विवाहपूर्व मुली ) मुलींसाठी विशेष कार्यक्रमाचे नियोजन केली आहे. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील शाळांना जेव्हा याबद्दल माहिती दिली त्यावेळी शाळांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. शाळेतील जागा, वेळ देऊ केला आहे.
पालकांनी सुद्धा हा उपक्रम समजून घेऊन आपल्या मुलींना यामद्धे सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. काही ठिकाणी मुलींनी स्वतः पुढाकार घेतला आहे. तर काही ठिकाणी आमच्या स्वयंसेवक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले आहे. या मुलींना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधणे सुरु आहे.