स्वच्छ भारत मध्ये विचार करण्या सारखी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छतेचा नारा लावताना, केवळ नियोजन व सुरुवात, म्हणजे केवळ समारंभा पूर्ती स्वछता लक्ष्यात घेऊन नाही चालणार.
माझी अनेक ठिकाणी , विविध विषयासाठी अगदी साध्या प्रवासी माध्यमातून प्रवास करण्याची सवय आहे. प्रवासी मार्ग, सार्वजनिक स्वछता गृह, शासकीय कार्यालय, गाव स्तरावरील कार्यालय, सर्वत्र कधी ना कधी ती वापरावी लागलीच, त्या वेळी अनुभवास आलेल्या गोष्टी अस्वछता, पाण्याचा आभाव, आडोसा, स्वरंक्षणात्मक सोयी म्हणजे दरवाजा, पुरेसा लाईट नसणे , इत्यादी. पैसे देऊन वापरात असलेली स्वच्छता गृहे देखील पुरेसे बऱ्या स्थितीत जाणवत नाहीत, कारण केवळ नियमां नुसार 1,2 वेळा पाणी टाकून स्वछता उरकली जाते, डस्टबीन ची तर वानवाच.बरं या बद्दल कोणाशी बोलाव तर उत्तर ऐकून आपण निरुत्तर, आम्ही काय करणार, महिलाच नीट वापरत नाहीत .
आता या सर्वातून असे लक्ष्यात येत आहे की सर्व पातळी वर आपल्याला एकाच वेळी काम करायला हवे आहे.म्हणजे धोरणात्मक पातळीवर, जन समुदाय पातळीवर व अंमल बजावणी यंत्रणांच्या पातळी वरती.तरच आपल्याला अपेक्षित यश मिळू शकेल.
3 जानेवारी २०२३ ला झालेल्या स्नेह समृद्धी मंडळ संस्थेच्या कार्यालयातील क्रांती-ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या विषयावर आपण भारतीय स्त्री-शक्तीचे सहकार्य घेऊन नियोजन करावे असे ठरले आहे.महिला बचत गटांच्या पातळी वरती स्वछतेचे महत्व व आपली जबाबदारी या विषयी जागृती करावी.प्रत्येक सार्वजनिक ठिकाणे, शासकीय, अशासकीय कार्यालये, या ठिकाणी स्त्रियांच्या या महत्वाच्या विषयाचा विचार झालाच पाहिजे, केवळ स्वच्छता गृहे नाही तर आवश्यक सोयी सुविधा युक्त स्वच्छता गृहे असायलाच हवीत.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालय देवरुख प्रतिनिधी , अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रतिनिधी, महिला व बाल-कल्याण विभाग तालुका संगमेश्वर प्रतिनिधी, पोलीस स्टेशन- देवर प्रतिनिधी, वकील बार चे प्रातिनिधी, सामाजिक कार्यकर्त्या, उद्योजिका, स्नेहसमृद्धी संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते, उपस्थित होते सर्वाना या विषयी खूप संवेदना जाणवतात .
योग्य पद्धतीने सहकार्य घेऊन या विषया ची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी स्नेह समृद्धी मंडळ संस्था पुढाकार घेत आहे.