आज दि.3 जानेवारी 2025 “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले” यांची जयंती. स्नेह समृद्धी मंडळ संस्थेच्या प्रकल्प कार्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक मा. अनिल कुडाळकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणासारख्या महान कार्याची आठवण करून दिली. “स्त्रियांचा सर्वांगीण विकास ” हे संस्थेचे ध्येय आहे. त्यामुळे आपण त्यांचे ऋण कधीच विसरू शकत नाही. आपणच काय संपूर्ण समाज त्यांच्या आयुष्यभर ऋणातच राहील. त्यांनी केलेल्या कार्याच्या काही भाग जरी आपण काम केले तरी त्यांचं कार्य सार्थकी लाभेल असे मत त्यांनी व्यक्त केले. संस्थेच्या सचिव मा. सुजाता प्रभुदेसाई कार्यकर्ते मा.सुनिता माईन, नयन शिंदे , वैभव गवंडी, छाया दिघे, श्रावणी काबदुले व प्रियांका खामकर यांनी “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले” यांच्या महान कार्यविषयीं थोडक्यात आपले विचार मांडले.
संस्थेच्या दैनंदिन चहाच्या ब्रेक मध्ये आठवड्यातुन एकदा प्रत्येक कार्यकत्याने सावित्रीबाईंसारख्या होऊन गेलेल्या महान व्यक्तिमत्व बद्दल थोडक्यात माहिती सांगावी असा संकल्प यानिमित्तने करण्यात आला.