आधार गटांनी गावातील कुटुंब व्यवस्थेची कशी काळजी घ्यावी या संदर्भात संस्थेच्या कार्यकर्त्या व समुपदेशक सुनीता माईन यांनी देवधामापूर, मानसकोंड आणि ताम्हाणे या गावातील आधारगटांना मार्गदर्शन केले. कुठे अगदी किरकोळ कारणाने कौटुंबिक स्वास्थ्य बिघडू शकते. जर वेळेवर त्या गोष्टींची दखल आपण घेतली नाही तर कुटुंबाची व्यक्तिगत पातळीवरील कुरबुर सार्वजनिक झाली कि दुसऱ्यांना लक्ष द्यावे लागते. पोलीस पाटील, पोलीस स्टेशन, न्यायालय अशा पायऱ्या कधी गाठायची वेळ येते हे लक्षात येत नाही. अगदी किरकोळ कारण सुद्धा सर्वनाशाकडे घेऊन जाते हे लक्षात घेऊन आधारगटातील सदस्यांना मार्गदर्शन करणेत आले.
देवधामापूर, मानसकोंड आणि ताम्हाणे गावांतील महिला आधारगटांना मार्गदर्शन करताना संस्थेच्या कार्यकर्ता सुनिता माईन