स्त्री” चा आत्मविश्वास, जिद्द जागृत करण्याचा प्रयत्न करून ती आत्मनिर्भर व्हावी, कुटूंबामध्ये, समाजामध्ये व पंचायत राज सारख्या शासकिय उपक्रमांध्येही तिला लीलया वावरता यावं हे ध्येय्य समोर ठेऊन स्नेह समृध्दी मंडळ आजवर कार्य करीत आली आहे. स्त्रियांचे खच्चीकरण होऊ नये, त्यांचा आत्मविश्वास जागृत रहावा जेणेकरुन त्या येणाऱ्या प्रसंगाला सामोरं जावू शकतील यासाठी संस्था सतत प्रयत्नशिल आहे.
“स्त्री” शैक्षणिकदृष्टया पुढे आली तर तिच्या विकासाच्या संधी विस्तारल्या जातील. ती आर्थिकदृष्या, वैचारीकदृष्टया आत्मनिर्भर होईल आणि सहाजिकच “कुटूंबातील एक महिला शिक्षीत तर संपूर्ण कुटूंब शिक्षीत” या उक्तीप्रमाणे आपले ध्येय्य साध्य होण्यास मदत होईल. यासाठी संस्थेच्या प्रकल्प “विद्या” अंतर्गत सुरु असलेल्या शैक्षणिक आर्थिक सहाय्याला गावागावांतून खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अर्धवट शिक्षण सोडणाऱ्या मुलींना आणि त्यांच्या पालकांना यामुळे खुप चांगली मदत होत आहे. त्यामुळे मुलींची शैक्षणिक प्रगती होत आहे. संस्थेच्या प्रकल्प “समर्था” ला यातुनच वेग मिळेल अशी आशा वाटते.
संस्थेकडून शैक्षणिक आर्थिक मदतीचे नुकतेच धनादेश वाटप सुरु झाले आहे. पूर्ण प्राथमिक शाळा आंबवली नं.२, जि.प.शाळा कानरकोंड या ठिकाणी धनादेश वितरण करण्यात आले. तसेच मानसकोंड, देवधामापूर या गावांमध्येही धनादेश वितरणाचे कार्यक्रम पार पडले. यावेळी शिक्षक, पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी हजेरी लावली आणि संस्थेचे आभार व्यक्त केले. कोसुंब हायस्कुलच्या विद्यार्थिनींनी संस्थेच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक व इतर कार्यकर्त्यांशी मुलींनी गप्पा मारल्या. काही महत्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. मुली खुप उत्साही आणि आनंदी होत्या.