देवरुख होम प्रॉडक्ट्सची दिवाळी जशी मागील वर्षी लाखमोलाची झाली होती त्याप्रमाणेच यंदाच्या दिवाळीतही अंदाजे लाखभर रुपयांच्या मालाची विक्री झाली. दिवाळीपूर्वी १५ ते २० दिवस सातत्याने फराळाचे पदार्थ बनविण्याचे काम सुरु होते. लोकांच्या पसंतीला उतरलेले देवरुख होम प्राडक्टस्चे पदार्थ आणि त्यांनी आमच्या उत्पादनांना दिलेला प्रतिसाद यांमुळे महिलांचा उत्पादनांची मागणी पूर्ण करण्याचा उत्साह प्रचंड होता.
महिनाभरात अंदाजे ६ महिलांना रोजगार उपलब्ध झाला आणि ही एकूण रक्कम २५ हजार होती. पण दरवर्षी हुकमी पन्नास हजार ते साठ हजारांची विक्री केवळ दोन तीन दिवसात होण्याची संधी असलेले. L&T HO CSR यांच्या प्रदर्शनात सहभागी होऊ शकणार नव्हतो. त्यामुळे विक्रीची सरासरी राखणं तसं आव्हान होतं. परंतु यंदाच्या दिवाळीमध्ये मागिल वर्षीच्या ग्राहकांचे नातेवाईक आणि मित्र मंडळी यांनीही उत्पादनांना मागणी केल्यामुळे ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली. ग्राहकांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत जाणं हेच ग्रामीण भागातील महिलांच्या प्रयत्नांचं यश आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या सर्व प्रयत्नांमध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मदत केली आहे त्या सर्वांचे संस्थेमार्फत व देवरुख होम प्रॉडक्टस् मार्फत मनःपूर्वक आभार.