
संस्थेच्या कार्यक्षेत्रातील युवती गटांमधील मुली विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध अन्न पदार्थ बनविणे इ. उपक्रम राबविण्यासाठी स्वतःहुन पुढाकार घेत आहेत. गावांमध्ये दरमहा होत असलेल्या बैठकांमुळे एकत्र येऊन काहीतरी नवीन करण्याचा उत्साह या मुलींमध्ये वाढताना दिसत आहे.
कानरकोंड या गावातील सुकन्या युवती गटातील मुलींनी स्वतः माईन मॅडम यांना आपण विविध खेळ व कलागुणदर्शनाचे कार्यक्रम घेऊया का, असे सुचविले. माईन मॅडम यांनी लगेचच मुलींच्या या कल्पनेला होकार दिला आणि दि.२१/१२/२०२४ रोजी अशा प्रकारचा कार्यक्रम या गटामध्ये मुलींनी सादर केला. यामध्ये, संगीत खुर्ची, चमचा गोटी स्पर्धा, बिस्कीटं खाणे, नृत्य करणे, जाकडी नृत्य, गवळण इ. पारंपारीक खेळही मुली खेळल्या आणि अतिशय निखळ आनंद त्यांनी यावेळी अनुभवला. गटातील १९ मुली उपस्थित होत्या. मा. माईन मॅडम यांनी या खेळांमधून मुलींचे काही नंबरही काढले. यामुळे मुलींना अधिक प्रोत्साहन मिळण्यास नक्कीच मदत होईल.
मुलींनी एकजुटीने एकत्र येणं, काही चांगल्या गोष्टी करणं, मार्गदर्शनपर माहिती आत्मसात करणं आणि त्याचा आपल्या प्रगतीच्या दृष्टीने सदुपयोग करणं हे संस्थेचे धेय्य यातुन नक्कीच साध्य होताना दिसत आहे. मुलींमध्ये बैठकांना येण्याची आवड निर्माण होऊन आपण काहीतरी केलं पाहिजे याची त्यांना जाणीव होत आहे. यासाठी मा. सुनिता माईन मॅडम व त्यांना सतत प्रोत्साहन देण्याऱ्या संस्थेच्या अध्यक्षा मा. श्रध्दा देशपांडे मॅडम यांचे मनःपूर्वक आभार !


