कोटुंबिक सल्ला केंद्र

राज्य महिला आयोग व महिला व बाल कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संगमेश्वर तालुक्या साठी 2008 पासून स्नेहसमृद्धी कोटुंबिक सल्ला केंद्राची स्थापना
महिलांना कुटुंबातील ,नाते सम्बधातिल व्यक्ती पासून होणाऱ्या त्रास बद्दल तक्रार निवारण करणे .
केस दाखल झाल्यावर त्याची तीव्रता लक्ष्यात घेऊन ,दोन्ही पक्षाच्या मंडळींना बोलावून सामोपचाराने प्रश्न सोडवण्याचा शर्थीचे प्रयत्न करण्यात येतात ,
ज्या केसेस मध्ये पोलीस स्टेशन,कोर्ट यांची मदत घ्यावी लागते ,त्या ठिकाणी पोलीस अधिकारी ,संरक्षण अधिकारी व विधी सेवा प्राधिकरण यांचे बरोबर समनव्य घडवणेत येतो
जन जागृती

महिलांच्या दृष्टीने असलेल्या कायदेशीर मदत देणाऱ्या यंत्रणांची माहिती देणे, गावपातळीवर असलेल्या यंत्रणांना बरोबर घेणं जस गटातील सदस्यांना बरोबर घेऊन आधार गटाची रचना तयार झाली ,या महिलांना गाव स्तरावर कोणत्याही वेळी मदतीचा हात मिळावा या साठी आधार गट रचना तयार झाली,अनेक गावा मध्ये आधार गट काम करीत आहेत
बचतगट,ग्राम पंचायत ,तंटा मुक्ती ,गाव/वाडी प्रमुख ,गावातील वेवेगळ्या विषयांत काम कामकरणारे कार्य कर्ते, व अनुभवी गावकरी अशा वेवेगळ्या स्थानिक लोकांना या केंद्राची माहिती देणेत येते ,पिडीत व्यक्तीला गरजे नुसार जोडून देण्यात येते
पीडित व्यक्तींच्या शारिरीक व मानसिक आरोग्याचा विचार करणेत येतो,तिच्या समस्ये नुसार तिला सुपदेशन, आरोग्य सेवा व कायदे विषयक सेवा देण्यात येतात,या साठी सम्बधित सेवा केंद्राची माहिती महिलांना देण्यात येते