“सॉफ्ट द नेक्स्ट”, पुणे हि कंपनी अनेक NGO आणि DONAR यांच्याबरोबर एकत्रितपणे काम करीत असून यांच्या माध्यमातून आपल्या संस्थेस प्रोजेक्टर डोनेट करून सहकार्य केले.
मनःपूर्वक धनवाद!
स्नेह समृद्धी मंडळ संस्थेचे संस्थापक आणि सल्लागार श्री. रामचंद्र देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेच्या कार्यकर्त्यां समवेत प्रदान करण्यात आलेल्या प्रोजेक्टरचे उदघाट्न कारण्यात आले.
सॉफ्ट द नेक्स्ट यांच्या सहकार्यामुळे संस्थेला आपल्या कार्यक्षेत्रात शेतकरी, महिला आणि विध्यार्थी वर्गाला प्रोजेक्टर च्या माध्यमातून विविध प्रशिक्षणे, जनजागृती कार्यक्रम, अनेक सामाजिक उपक्रमे आणि त्यांचा प्रचार-प्रसार करण्यास याचा उत्तम उपयोग करता येणार असून कार्यालयीन पातळीवर देखील उपयुक्त ठरणार आहे.
अशा डोनर नी स्नेह समृद्धी मंडळ संस्थेला वेळोवेळी आर्थिक आणि इतर कुठल्याही स्वरूपातील मदत /सहकार्य केल्यास ग्रामीण भागातील अनेक गरजू लोकांना वेगवेगळ्या गोष्टींसाठी संस्थेला चांगल्या पद्धतीने सहकार्य करता येईल.
पून्हा एकदा सॉफ्ट द नेक्स्ट, पुणे या कंपनीचे मनापासून आभार!