ग्रामीण भागामध्ये स्नेह समृद्धी मंडळ या संस्थेचे सामाजिक कार्य १९९३ पासून गेली २६ वर्षे सुरु आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकरिता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविणे, महिलांचे संघटन करणे, त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रयत्न करणे, उदा. कौशल्य, नेतृत्व, व्यक्तिमत्व, क्षमता बांधणी आशा  विषयी प्रशिक्षणे देणे, तसेच युवक – युवतींकरिता रोजगार उपलब्ध करून देणे इ. प्रकारची कामे गेली अनेक वर्षे सुरु आहेत. जेणेकरून ग्रामीण भागातील अशिक्षित, गरीब, दुर्बल व्यक्तींना त्याची मदत होत आहे. अशा कुटुंबातील मुलामुलींना जर शिक्षण मिळाले तरच ते कुटूंब प्रगतीच्या वाटचालीकडे जाईल याकरिता प्रथम आपण या कुटुंबातील मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण घेण्यास मदत करू या उद्देशाने स्नेह समृद्धी मंडळ स्वतः काही मुलामुलींना आर्थिक मदत करीत आहे. त्याचप्रमाणे समाजातील काही संवेदनशिल देणगीदारांच्या माध्यमातुन मदत करणेचे काम सुरु आहे.

हे काम करीत असताना अशा प्रकारची मदत अनेक मुलामुलींना आवश्यक आहे, जेणेकरून त्यांच्या वैयक्तिक व कौटुंबिक आयुष्यामद्धे खूप चांगला बदल घडवून आणता येईल. अशा प्रकारच्या देणगीमधून मिळणाऱ्या रक्कमेतून आपण ग्रामीण भागातील गरीब, होतकरू , गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थी -विद्यार्थिनींना शैक्षणिक खर्चामद्धे हातभार लावून त्यांच्या समस्या कमी करण्याचा प्रयत्न या प्रकल्पामधून करीत आहोत. उदा. एखाद्या विद्यार्थी -विद्यार्थिनींना शाळेत जाण्याकरीता खूप अंतर चालावे लागत असेल व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सोय नसेल तर त्याला सायकल उपलब्ध करून देणे किंवा प्रवास खर्चाची तरतुद करणे, वह्या पुस्तके, शालेय गणवेश, शाळेची फी, विशेष प्रकल्पाकरिता मदत करणे (तंत्रज्ञान विषयी ), विशेष गरज (उदा. कपडे, दप्तर, चप्पल, छत्री) इ. प्रकारच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे. वरील सर्व गरजांचा विचार करून विद्यार्थी -विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत करून त्यांच्या जीवनामद्धे चांगल्या प्रकारचा बदल व्हावा याकरीता संस्था प्रयत्नशील आहे.

ग्रामीण भागातील मुलांना त्यांच्या योग्य जडणघडणीच्या दृष्टीने मार्गदर्शन व्हावे या हेतूने वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षणे घ्यावीत असे संस्थेच्या लक्षात आले आहे. हि सर्व मुले पौगंडावस्थेतील असल्यामुळे शारीरिक व मानसिक बदल होत असताना त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज लक्षात घेऊन प्रशिक्षणांचे विषय निश्चित करण्यात आले आहेत. या प्रशिक्षणांच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना चांगल्या भविष्याकडे वाटचाल करता येईल असा संस्थेला विश्वास वाटतो.

या दृष्टीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चाकरिता प्रत्यक्ष आर्थिक मदत व मार्गदर्शनपर प्रशिक्षणे याकरिता आर्थिक सहकार्याची गरज संस्थेला वाटते आहे.

Bank Details:

SNEH SAMRUDDHI MANDAL
JANATA SAHAKARI BANK , Devrukh
A/C NO. 025220100004899
IFSC. JSBP0000025