पर्यावरण संवर्धन

शेती
कोकणात प्रामुख्याने भात लागवड आहे, छोटे शेतकरी असल्याने खूप मोठ्या प्रमाणात नगदी पिके शेतकरी घेत नाहीत ,अल्पभूधारक असलेल्या या शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढ विण्याच्या दृष्टीने संस्थेने प्रयत्न केले आहेत
सेंद्रिय शेती,पर्यावरण पूरक शेती , भात लागवडीचे नाविन्यपूर्ण प्रयोग,बांबू लागवड,बचत गटा साठी प्रयोगिकत्त्वावर नर्सरी असे कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी 2005 पासून घेण्यात येत आहेत
या करिता शेतकऱ्यांना ट्रेनिग ,अभ्यास दौरा ,तज्ञांच्या भेटी ,असे कार्यक्रम घेण्यात आले

पाणी
कोकणात पाऊस जरी भरपूर पडत असला तरी पाणी धारण शक्ती कमी आहे ,पडणार पाणी समुद्राला जाऊन मिळते. हे लक्षात घेऊन पुढील उपक्रम घेण्यात आले
पाणी अडवून जमिनीत मुरवणे,नैसर्गिक पाणी स्रोताचे संवर्धन करणे ,पाणी आडवा पाणी जिरवा याचं महत्व लोकांपर्यत पोचवणे असे उपक्रम राबविण्यात आले
परसबाग
घरा सभोवतीच्या जागेचा सुयोग्य वापर करून ,घरामध्ये वापरुन बाहेर टाकलेल्या पाण्याचा योग्य पद्धतीने पुनर वापर करून उत्तम परसबाग करण्याचं प्रशिक्षण महिलांना देण्यात आले या मध्ये पालेभाज्या,फळभाज्या, मसाला पिके,औषधी वनस्पती शोभिवंत झाडे,फुलं झाडे या साऱ्याचा समावेश होता

लागवड कार्यक्रम
बांबू लागवड, मसाला पिके ,फळझाडे , SRI भात लागवड इत्यादी