महिलासक्षमीकरण

अशिक्षित सध्या च्या काळात अल्पशिक्षित ,बाह्यजगाची ओळख नसलेल्या स्त्रियांना आत्मविश्वास देऊन स्वबळावर उभे करण्याच्या हेतूने स्नेहसमृद्धी मंडळाची स्थापना 18 दिसेम्बर 1992 रोजी झाली. मंडलची कायदेशीर नोंदणी ऑगस्ट 1993 ला झाली
स्वतःची ओळख करून देताना संकोच करणाऱ्या महिला आज मोठ्या जन समुदाया समोर खडखडीत भाषण करू लागल्या आहेत, विविध पदांवर दिसू लागल्या आहेत ,त्या पदांची समर्थ पणे जबाबदारी सांभाळताना दिसतात.
घरी आलेल्या पाहुण्यांना चहा ,पाणी देण्या साठी ओसरीवर/बाहेरच्या खोलीत नयेणाऱ्या स्त्रिया आज हॉटेल,केटरिंग व्यवसायात वावरताना दिसून येऊ लागल्या आहेत.
आपले नातेवाईक,आपले शेजारी यांच्या कडे सण समारंभ,किंव्हा वाईट प्रसंगाला केवळ सहभागी होणाऱ्या स्त्रिया आज बचत गट,ट्रेनिंग,प्रदर्शने,अभ्यास दौरे ,कार्यालयीन सम्पर्क,, बँक सम्पर्क ,आशा सर्वत्र वावरताना दिसतायत
100 रुपये कर्ज घ्या साठी जिच्या साठी काही वर्ष्या पूर्वी आटापिटा करावा लागला ती आज लाखो रुपयांचे कर्ज घेऊन व्यवस्थित परत फेड करू लागलीय
लाखो रुपयांची हाताळणी करणाऱ्या स्त्रिया आज बचत गटात आपण पाहू लागलोय
हा प्रवास म्हणजे तिचे सक्षमीकरण