
स्नेह समृध्दी मंडळ संस्थेने कार्यक्षेत्रामध्ये “महिलांचा सर्वांगिण विकास” हे धेय्य डोळयासमोर ठेवुन आजपर्यंत अनेक उपक्रम राबविले. महिलांचा सर्वांगिण विकास घडवायचा असेल तर ती महिला आणि तिचे कुटुंब साक्षर असणे खुप महत्वाचे होते. सन १९९३ मध्ये शासनाच्या साक्षरता अभियानामध्ये सहभागी होऊन बचतगटांतील अशिक्षीत महिलांना साक्षर करण्याचा प्रयत्न संस्थेने केला. संस्थेचा महिला सक्षमिकरणाचा उददेश साध्य करण्याच्या दृष्टीने हे अभियान अतिशय महत्वाचे असल्याने संस्थेने यामध्ये उत्सफुर्त सहभाग घेतला होता. त्याचा चांगला परिणाम महिलांवर व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर झाला. अनेक महिला अंगठा देण्याऐवजी सहया करु लागल्या.
दि.०३/१०/२०२५ रोजी धामापूर येथील महिलांची मासिक बैठक पार पडली. कर्ज देव-घेव व हिशेब असा दरमहाचा विषय झाल्यावर पुन्हा एकदा साक्षतेची उजळणी करण्याचा प्रयत्न शासनाचा असल्याने या बैठकीला शासनाच्या उमेदच्या उपक्रमांतर्गत निरक्षर महिलांना पाटी-पेन्सीलचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संस्थेच्या कार्यकर्त्या मा. सुनिता माईन प्रमुख उपस्थित होत्या. त्यांनी संस्थेने निरक्षर महिलांसाठी याआधी केलेल्या कार्याची तसेच त्यावेळी संस्थेच्या प्रयत्नातुन अनेक महिला सही करु लागल्या होत्या त्या महिलांची नावे घेऊन आठवण करुन दिली. महिलांसाठी संस्थेने आजपर्यंत केलेल्या अनेक यशस्वी उपक्रमांबद्दल त्यांनी यावेळी भाष्य केले. महिलांनी साक्षर होणे किती महत्वाचे आहे हे पटवून सांगितले.
उपस्थित महिलांनी माईन मॅडम यांचे आभार मानले व बैठकीचा समारोप करण्यात आला.
