क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने स्नेह समृद्धी मंडळ संस्थेच्या प्रकल्प कार्यालयामद्धे दि. ०३/०१/२०२३ रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला समाजातील विविध क्षेत्रात, विविध पदांवर काम करणाऱ्या महिला अधिकारी तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सध्याच्या सामाजिक स्थितीचा विचार करून मुली व स्त्रियांच्या दृष्टीने आपली भूमिका व मते सर्वांनी यावेळी व्यक्त केली. आपल्या अनुभवातून व महिलांच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्वाची चर्चा झाली. आपण सर्वच काही वेगवेगळे अनुभव घेत असतो त्यामधून काही विषय लक्षात आणले गेले व त्यावरती उपाययोजना करण्यात याव्यात यादृष्टीने काही बाबी ठरविण्यात आल्या. ज्यामद्धे सर्वांनी एकत्र येऊन एक महिला मंच तयार करावा व स्नेह समृद्धी मंडळ मार्फत या मंचाची स्थापना व्हावी असे सर्वानुमते ठरले. संस्थेने यासाठी तयारी दर्शविली.

भारतीय स्त्री शक्ती, देवरुख – रत्नागिरी या व्यासपीठामार्फत स्त्रियांच्या डिजिटल साक्षरता, कायदेविषयक साक्षरता यासाठी नियोजन करण्यात येणार आहे याबद्दल देखील स्नेह समृद्धी मंडळ संस्थेमार्फत सर्वांना सांगण्यात आले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिला प्रतिनिधींचे संस्थेमार्फत मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *