देवरुख मधील आठल्ये सप्रे महाविद्यालयाकडून आपल्या संस्थेला विद्यार्थीनींसाठी मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या अनुषंगाने स्नेह समृद्धी संस्थे कडून संस्थेच्या महिला कार्यक्रम अधिकारी सौ. नयन शिंदे यांच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले.


स्नेह समृद्धी संस्थेच्या माध्यमातून किशोरी विकास, विद्यार्थी व विद्यार्थिनी विकास यासाठी नेहमीच प्रयत्न सुरु आहेत. संगमेश्वर तालुक्यातील पूर्ण प्राथमिक व माध्यमिक शाळांना नेहमीच संपर्क ठेऊन मुलींना मार्गदर्शन करण्यात येते. तसेच शैक्षणिक आर्थिक सहाय्य देखील संस्था अनेक दानशूर व्यक्तींच्या व संस्थांच्या सहकार्याच्या माध्यमातून करीत आहे. देवरुख महाविद्यालयाच्या मार्फतही संस्थेला विद्यार्थी व विद्यार्थींनी पर्यंत पोहचता आले. यासाठी देवरुख कॉलेजचेही मनापासून धन्यवाद आहेत.


दिनांक.3 मार्च 2023 रोजी ” माझं स्त्रीत्व मी जपणार ” या विषयावर सविस्तरपणे मार्गदर्शन सौ. नयन शिंदे यांच्याकडून करण्यात आले. यामध्ये मुलींच्या अवस्था म्हणजे जन्माला येण्यापुर्वीपासून ते दुसऱ्या सजीवाला जन्म देई पर्यंतच्या अवस्था व त्यातील स्थिती, धोके आणि जबाबदारी याबाबतची मांडणी करण्यात आली. या निमित्ताने कॉलेज च्या मुले व मुली हा गट संस्थेच्या संपर्कात आला. या गटाबरोबर खूप काम करणे अगत्याचे आहे. स्त्री संरक्षण, स्त्री जागर, स्त्री चे आत्मभान, स्त्री ची सर्वांगीण प्रगती आणि स्त्री चे आरोग्य या सार्वांवर विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न सातत्याने करणे गरजेचे आहेत.


कॉलेज च्या प्राध्यापिका यांनी देखील दर महिन्याला या विद्यार्थिनींसाठी अशा विषयांवर सत्र संस्थेमार्फत घ्यावे असे सुचवले आहे.कॉलेज नी सुचवल्या प्रमाणे स्नेह समृद्धी संस्था अतिशय मनापासून यासाठी वेळ देईल असे ठरले.
धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *