ग्राम पंचायतींमध्ये गावाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने नियोजन करावं, कोणत्या संकल्पना निश्चित करण्यात आल्या आहेत, त्या कशा पद्धतीने प्रत्यक्षात आणाव्यात याबाबत सविस्तर मार्गदर्शन इतर जिल्ह्यात देण्यात येते, मग आपल्या तालुक्यात गरज वाटल्यास संस्थेच्या वतीने नक्की सहकार्य करणेत येईल. लोक सहभाग कसा, योजनांची माहिती कशी घ्यावी, त्यासाठी आर्थिक नियोजन कसे करावे याबाबतची मांडणी संस्थेच्या वतीने मांडण्यात आली.
सरपंच, उपसरपंच व निवडक ग्रामस्थांनी असे सहकार्य आमच्या ग्राम पंचायतीला म्हणजेच आंबेड बुद्रुकसाठी द्यावे अशी मागणी केली आहे.
संस्थेच्या अध्यक्ष यशदाच्या प्रवीण प्रशिक्षक आहेत. त्यामुळे असे ग्राम पंचायतींमद्धे काम करण्याची संधी मिळाल्यास खूपच समाधानकारक गोष्ट आहे. लवकरच संस्थेचे पदाधिकारी या विषयासाठी आंबेड बुद्रुक येथे जाऊन सरपंच व पूर्ण बॉडी आणि ग्रामसेवक यांच्या बरोबर चर्चा करतील. सामाजिक संस्थांना त्यांच्या कार्यकर्त्यांना याचा खूपच आनंद आहे.

