स्नेह समृद्धी मंडळाच्या अध्यक्षा सौ. श्रद्धा रामचंद्र देशपांडे यांच्या वाढदिवसाचे निम्मित साधून, संस्थेच्या यशस्वी वाटचाली मध्ये म्हणजे संस्था, कार्यकर्ते, संस्था कार्यशेत्र आणि सामाजिक घटक यांना योग्य पद्धतीने दिशा व मार्गदर्शन कशाप्रकारे मिळेल तसेच विविध स्तरांवरील व्यक्तीचे मार्गदर्शन मदत, सहकार्य आणि संस्थेच्या सामाजिक हिताच्या दृष्टीने कोण व कुठल्या जबाबदाऱ्या घेऊ शकेल अशा अनेक महत्वाच्या विषयांबाबत या प्रसंगी विस्तृत स्वरूपात संस्था पदाधिकारी, कार्यकर्ते, सल्लगार, हितचिंतक व देशपांडे परिवार यांच्याशी सावली या निवास्थानी चर्चा पार पडली.

यावेळी संस्थेच्या अधक्ष्या सौ. श्रद्धा देशपांडे यांनी उपस्थित सर्व जणांचे स्वागत व आभार मानून आपले मत /मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या 1992 पासून ते आजपर्यंतचा प्रवास आपल्या सहकाऱ्यांशी साधून संस्थेच्या पुढील प्रगतीसाठी आपले व्हिजन कसे असावे याबाबत सविस्तर चर्चा करताना मांडले की – आपण कोणाची व कशा प्रकारे मदत घेता येईल, संस्था व शासन यांचा योग्य समन्वय, कार्यकर्ते यांचे बळकाटिकरण, संस्था व कार्यक्षेत्रातील लोकांबरोबरच नातं अधिक कसे बळकट होईल आणि त्यांना योग्य मार्गदर्शनातून त्यांचा विकास कसा साधता येईल, आणि संस्थेचे सल्लगार व हितचिंतक यांचे मदतीने अजून आपले कार्य कसे पुढे नेता येईल अशा अनेक महत्वाच्या विषयावर आपले मत व्यक्त केले. तसेच आजपर्यंत हे सर्व करताना संस्थेचे व्यस्थापक श्री. अनिल कुडाळकर आणि सचिव. सौ. सुजाता प्रभुदेसाई यांनी त्यांना दिलेली जबाबदारी अगदी निस्वार्थी पणे यशस्वीरित्या पार पाडली यांचे विशेष आभार मानले.

तसेच या सर्व विषयावर चर्चा करून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

1) स्नेह समृद्धी मंडळ संस्थेचा वार्षिक वर्धापन दिन साजरा कारण्यात यावा.. जेणेकरून आपल्या कार्याची माहिती व प्रसिद्धी सर्वांना होईल.
2) संस्थेने आता स्वयंसेवक यांची निवड विविध पातळीवरील निवडावे व त्यांच्या मार्फत काम करावे. उदा – ( शासकीय, कार्यक्षेत्र, व्यवस्थापकीय, तांत्रिक संबंधि, गावास्तरीय, कृषी इ.)
3) काही तांत्रिक पद्धतींचा वापर करून सर्वेक्षण सारख्या गोष्टींसाठी सहकार्य करण्याची जबाबदारी देखील स्वतःहून घेण्याची तयारी दाखवण्यात आली .

या कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे सर्व विश्वस्थ ,सल्लागार ,हितचिंतक ,कार्यकर्ते आणि परिवार यांनी एकत्रितपणे संस्थेचे कार्य अधिक प्रभावी व सुलभ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले . उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *