स्नेह समृद्धी मंडळ संस्था स्थापन करण्याचा मुख्य उद्देश होता तो म्हणजे ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास करणे .याकरिता प्रभावी माध्यम कुठले होते तर महिला बचत गट . बचत गटाच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणी ,उद्योग, नेतृत्वगुण ,बचतीची सवय ,विचारांची देवाण-घेवाण होते . तसेच त्यामधून सामाजिक ,आर्थिक व राजकीय विकासही साधला जातो . म्हणूनच महिलांच्या विकासासाठी महिलांना बचत गटात सहभागी करणे खूप महत्वाचे आणि गरजेचे होते.
सुरवातीला महिलांना वेगवेगळ्या विकासाच्या पैलूंची माहिती देण्यात आली . महिलांना विविध स्तरांवर प्रशिक्षणे ,डेमॉन्स्ट्रेश ,आणि संधी देण्याचा प्रयत्न राहतो . याकरिता शासनाच्या व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून स्नेह समृद्धी संस्था स्वतः नियोजन करूनहे काम करीत आहे . स्वयं सहाय्यता बचत गटाच्या बांधणी मध्ये संस्थेचा उत्तम सहभाग होता . दारिद्र्य निर्मूलनाच्या उद्देशाने शासनानेबचत गटाच्या माध्यमातून आर्थिक विकासाकडे असे पाऊल टाकायचे ठरवले,यामध्येही पुढाकार व जबाबदारी स्नेह समृद्धी मंडळाने घेतली .गटांची बांधणी ,प्रशिक्षणे ,उद्योगांची निर्मिती ,बाजारपेठ सहभाग व व्यवस्थापन आणि बचत गटांचे फेडरेशन करून महिलांच्या हातालाकाम देण्यासाठीची धडपड सुरु ठेवली .
या प्रवासात महिलांच्या सामाजिक जाणीवा तयार होण्यासाठो संस्था प्रयत्नशील राहिली . कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी संस्थेच्या शासनमान्य सल्लाकेंद्राच्या बरोबर संस्थेने स्थापन केलेल्या महिला आधार गटामार्फत पीडित महिलांना सहकार्य कसं करता येईल याचा प्रयत्न राहिला. पंचायत राज विषयात महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विषयक संधी ,आरोग्य ,शिक्षण यामध्ये महिलांना कोणत्या सहकार्याची गरज आहे ,याबाबत संस्था कायम दक्ष राहून कार्य करीत आहे. राष्ट्रीय जीवन उन्नती या शासनाच्या कार्यक्रमाला संस्थेचा कसा हातभार लागेलयाचाही संस्था विचार करीत आहे.
महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता आपली काही मते,सूचना किंवा काही संधी उपलब्ध असल्यास संस्थेला जरूर कळवाव्यात.
धन्यवाद !