देवरुख होम प्रॉडक्ट्स या आपल्या कंपनीची यावर्षीच्या गणेशोत्सवामद्धे अतिशय उत्तम विक्री झाली. त्यामुळे पुढील सण म्हणजे दिवाळी असल्याने त्यादृष्टीने जोरदार तयारी करण्याचा मानस कंपनीतील सदस्यांनी केला. L&T HO CSR यांच्यामार्फत दिवाळीपूर्वी दरवर्षी NGO चा मेळावा भरविण्यात येतो. त्या मेळाव्याकरिता स्नेह समृद्धी मंडळ संस्थेमार्फत देवरुख होम प्रॉडक्ट्सची उत्पादने प्रदर्शन व विक्रीकरीता पाठविण्यात येतात. पापड, लोणची, पीठे, आणि दिवाळीचे खाद्यपदार्थ यामद्धे चकली, चिवडा, गोडे शंकरपाळे, खारे शंकरपाळे, बेसन लाडू, मुगलाडू, इ. यांना तेथील ग्राहकांचा दरवर्षीच उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. प्रदर्शन संपल्यानंतरही यांपैकी काही ग्राहकांकडून अनेक उत्पादनांना वर्षभर मागणी असते. यावर्षीही तशीच मागणी असेल अशी अपेक्षा आहे.

L&T HO CSR यांच्या मार्फत यावर्षीच्या प्रदर्शनामध्येही देवरुख होम प्रॉडक्ट्सची उत्पादने पाठविण्यात आली. अतिशय प्रामाणिक व सचोटीने काम करणारे देवरुख होम प्रॉडक्ट्सचे व्यवस्थापक श्री. वैभव गवंडी आणि त्यांना मोलाचे सहकार्य करणारे त्यांचे सहकारी श्री. मंगेश मांडवकर व श्री. सचिन भोले यांनी कंपनीमार्फत ३१ ऑक्टोबर २०२३ व १ नोव्हेंबर २०२३ अशा दोन दिवशीय प्रदर्शनामद्धे सहभाग घेतला. अपेक्षेप्रमाणे या प्रदर्शनातही कंपनीच्या उत्पादनांची अतिशय उत्तम विक्री होऊन कंपनीला त्याचा चांगला आर्थिक नफा झाला. यामुळे स्नेह समृद्धी मंडळ मधील सर्व कार्यकर्ते व कंपनीतील सदस्य आनंदित झाले. आता दिवाळी हंगामासाठीच्या तयारीला हे सर्वजण सज्ज झाले आहेत. खात्री आहे की, दिवाळीचा हंगामही ठरल्याप्रमाणे कंपनीसाठी उत्तम जाईल यात शंका नाही. ज्याचा फायदा कंपनीमद्धे काम करणाऱ्या महिलांना होऊन, संस्थेची पुन्हा एकदा धेय्ययपूर्तीच्या दृष्टीने वाटचाल सुरु असल्याचे समाधान संस्थेचे संस्थापक मा. श्री. रामचंद्र देशपांडे व अध्यक्षा मा.सौ.श्रद्धा रामचंद्र देशपांडे या उभयतांना मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *