समाजयोगी….”जग अधिक समृद्ध करायला निघालेली माणसं” या पुस्तकाचे पुणे येथे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकामद्धे लेखीका डॉ. वासंती जोशी यांनी समाजासाठी स्वतःचे आयुष्य वेचलेल्या तळमळीच्या समाजकर्त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला आहे. आपल्या संस्थेच्या अध्यक्षा आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या मा. श्रद्धा देशपांडे मॅडम यांच्या सामाजिक कार्याचाही थोडक्यात आढावा या पुस्तकामद्दे घेण्यात आला आहे.

खरंच, मा. देशपांडे मॅडम यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये केलेले सामाजिक कार्य हे अमुल्य आहे. लहानपणीच त्यांच्या आईवडिलांकडून समाजकार्याचे बाळकडु घेऊन त्यांनी आपले सामाजिक कार्य पुढे सुरु ठेवले. आपल्या संस्थेचे संस्थापक मा. रामचंद्र देशपांडे सर यांच्यासोबत देशपांडे मॅडम यांनी ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास हे धेय्य डोळ्यासमोर ठेऊन ग्रामीण भागातील महिला आणि महिलेचे कुटुंब यासाठी अनेक उपक्रम हाती घेऊन ते यशस्वीपणे राबविले आहेत. गेली २६ वर्षे सतत समाजाचा किंबहुना समाजातील सामाजिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करून त्यादृष्टीने कोणकोणते उपक्रम हाती घेतले पाहिजेत ते अचुक ओळखुन त्याप्रमाणे आपले सामाजिक कार्य त्यांनी सतत सुरु ठेवले आहे.

मा. देशपांडे मॅडम यांनी त्यांच्या वयाच्या साठीनंतरही कामातील उत्साह आणि वेग हा नवयुवतींना लाजवेल असाच आहे. आजही त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रामद्धे जाऊन तेथील लोकांचे प्रश्न, समस्या समजून घेऊन त्यादृष्टीने आपण सामाजिक संस्था म्हणून काय करू शकतो याबद्दल कार्यकर्त्यांना कळकळीने मार्गदर्शन करीत असतात. गावांमद्धे काम करीत असतानाच शासनाच्या प्रतिनिधींशी, अधिकाऱ्यांशी तसेच शासन यंत्रणांशी कसे वागले पाहिजे याबाबतही त्या कार्यकर्त्यांशी अतिशय दक्षतेने बोलत असतात. शांत स्वभाव, साधं रहाणीमान आणि समोरच्या प्रत्येक व्यक्तीला आपलंस करण्याची सचोटी यांमुळे देशपांडे मॅडम घरापासून-कार्यक्षेत्रापर्यंत सर्वांच्याच अत्यंत जवळच्या होऊन जातात. कोणताही प्रश्न मॅडमसमोर मांडला तरी त्यावर अत्यंत साध्या, सोप्या भाषेमद्धे उत्तर मिळणार हे ठरलेलं असतं. सर्वांचाच एक आधारस्तंभ म्हणून त्या सावलीसारख्या कायम खंबीर उभ्या असतात. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील महिलांना आपलंस करून त्यांच्यामद्धे एक नवीन उमेद निर्माण करण्याचं अतिशय आव्हानात्मक कार्य त्यांनी आजवर अत्यंत निःस्वार्थीपणे चालू ठेवले आहे.

विद्यादान संस्थेच्या, वाचन कट्ट्यावर मा. देशपांडे मॅडम यांची दोन दिवसीय ऑनलाईन मुलाखत घेतली. आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याविषयी ऐकून यामद्धे सहभागी झालेल्या व्यक्ती अत्यंत भारावून गेल्या आणि त्यांनी संस्थेच्या कार्यक्षेत्राला भेट देण्याची ईच्छा व्यक्त केली.

मा. देशपांडे मॅडम यांना आरोग्यदायी दिर्घायुष्य लाभो आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्यांची अशीच प्रेरणा व मार्गदर्शन मिळत राहून समाजोपयोगी कार्य आपल्या सर्वांच्या हातून घडत राहो अशा सर्व कार्यकर्त्यांकडून त्यांना मनःपुर्वक शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *