महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध पदार्थ करणाऱ्या महिलांनी यंदाच्या दिवाळीत अंदाजे लाखभर रुपयांच्या मालाची विक्री करून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे! अन्य उत्पादनांबरोबरच यंदा दिवाळीचे फराळाचे पदार्थही बनवण्याचे ठरवण्यात आले. त्यांची चव व गुणवत्ता उत्कृष्ट असल्याने ग्राहकांना आवडू लागले. दिवाळीपूर्वी २० ते २२ दिवस सातत्याने फराळ बनवण्याचे काम सुरु होते. स्थानिक बाजारात अंदाजे ४० हजार रुपयांची विक्री झाली. आम्हाला उत्पादने तयार करण्यासाठी वेळ अपुरा पडेल, अशी भीती वाटावी इतकी ऑर्डर पहिल्याच वर्षी मिळाली. आमची उत्पादने लोकांना आवडत असल्याचे, त्यांचा भरगोस प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून आमच्या सर्वांची मेहनत फळाला आल्याचे समाधान वाटले. योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी आमच्या संस्थेच्या अध्यक्षांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या निमित्ताने ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळतोय आणि त्यांनी बनवलेली उत्पादने लोकांच्या पसंतीत उतरत आहेत.

महिनाभरात अंदाजे ७ महिलांना रोजगार उपलब्ध झाला आणि हि एकूण रक्कम २५ हजार होती. L&T HO CSR यांच्या मार्फत झालेल्या NGO च्या मेळाव्यामद्धेही आपल्या उत्पादनांना ग्राहकांच्या उत्तम प्रतिसाद मिळाला. मुंबई व स्थानिक बाजारपेठ दोन्ही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळणे हा अनुभव आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आपली उत्पादने मुंबईतही विकली जावीत आणि तिथेही त्यांचा ग्राहकवर्ग निर्माण व्हावा यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करत आहोत. यंदा स्थानिक स्तरावरचा प्रयोग यशस्वी झाल्याने पुढच्या वर्षी आम्ही थोडे आधीपासून नियोजन करणार आहोत, तसेच मार्केटिंगवर भर देणार आहोत. यावर्षी अनपेक्षितपणे इतका चांगला प्रतिसाद मिळाला हि आमच्या सगळ्यांसाठी व संस्थेसाठी खूप मोठी गोष्ट आहे. ग्राहकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यावर आम्ही नक्की खरे उतरू. या सर्व प्रयत्नात ज्यांनी ज्यांनी आम्हाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत केली आहे त्या सर्वांचे संस्थेमार्फत आणि देवरुख होम प्रॉडक्ट्स तर्फे मनापासून आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *