भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचे आणि आपुलकीचे प्रतिक म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन या सणाला आपल्या भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक मुलीच्या अगदि जिव्हाळयाचा विषय आहे हा. बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याचे औक्षण करते. भाऊ त्या बदल्यात आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन घेते. आजकाल, राखी फक्त सख्या बहिणीच भावाला बांधतात असे नाही, तर मैत्रीण आपल्या मैत्रिणीला किंवा एखादी स्त्री आपल्या वडिलांना, गुरुला किंवा तिला योग्या वाटेल त्या पुरुषाला ती राखी बांधते. बदलत्या काळानुसार काही बदल समाजामध्ये होत असतात त्याप्रमाणे रक्षाबंधन या सणाच्या पारंपारिकपणा मध्येही थोडयाफार प्रमाणात बदल झालेला दिसून येतो.

संस्थेच्या प्रकल्पा “समर्था” व “विद्या” अंतर्गत अनेक मुलींच्या बैठका व प्रशिक्षण कार्यक्रम सुरु असतात. “रक्षाबंधन” निमीत्ताने कार्यक्षेत्रातील वांझोळे हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. कोरे सर यांनी मुलींना राखी शिकविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी संस्थेशी संपर्क केला. संस्थेने कोणताच विचार न करता लगेचच या प्रशिक्षणासाठी मान्यता दर्शविली. संस्थेच्या कार्यकर्ता सौ. नयन शिंदे यांनी स्वतः हस्तकला कौशल्याचे प्रशिक्षण याआधिच घेतले असल्यामुळे आणि अनेक वर्षे त्यांनी कार्यक्षेत्रातील मुलींना हस्तकलेच्या अनेक कला ज्यामध्ये, शिवणकाम, भरतकाम, विणकाम, इ. शिकविलेल्या असल्यामुळे त्यांनी वांझोळे हायस्कुलच्या मुलींना राखी शिकविण्याचे प्रशिक्षण घेण्याचे ठरविले.
दि.०७/०८/२०२५ रोजी वांझोळे या गावामधील हायस्कुलमध्ये अंदाजे ४५ ते ५० विद्यार्थिनींना लोकर, मोती, मणी, टिकल्या व इतर साहित्यापासून राखी बनविण्याचे प्रशिक्षण घेण्यात आले. मुलींनी अतिशय उत्साहाने यामध्ये सहभाग घेतला. त्यांच्या आवडीचा विषय असल्यामुळे त्यांनी खुप उत्तम पध्दतीने अतिशय सुंदर राख्या तयार केल्या. हे करीत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अगदि स्पष्ट दिसत होता. स्नेह समृध्दी मंडळ संस्थेचे श्री. वैभव गवंडी यांनी रक्षाबंधन या सणाविषयी मुलींशी केली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. पोरे सर व वर्गशिक्षीका सौ. पंदेरे मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी या प्रशिक्षणासाठी संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.
