संस्थेच्या कार्यक्षेत्रातील १२ ते २० वयोगटातील शालेय विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या उपक्रमामद्धे संगमेश्वर तालुक्यातील निवडक गावांमधील विद्यार्थिनींचा समावेश आहे. या कार्यक्रमांमार्फत मुलींना आरोग्य, करिअर, क्रीडा व कुटुंब जीवन शिक्षण यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

कौटुंबिक शिक्षणाचे महत्व पटवून देणे, या विषयातील त्यांची समज वाढविणे, मुलींची त्यांच्या दैनंदिन जीवनात व भावी आयुष्यात आपण काय करावं याबद्दल योग्य ते मार्गदर्शन करणे यासाठी संस्थेच्या अध्यक्षा कुटुंब जीवन शिक्षण विषयी मार्गदर्शन करताना.

TISS मधून शिक्षण घेऊन प्रत्यक्ष ग्रामीण विकासाचे काम उभे केलेले, ४० वर्षांहून अधिक अनुभव असलेले श्री. देशपांडे सर यांनी विद्यार्थिनींना कुटुंब जीवन शिक्षण विषयी मार्गदर्शन केले.

डॉ. श्री. विशाल शिर्के यांनी मुलींना शारीरिक व मानसिक आरोग्य याबाबत शास्त्रीय माहिती व माहितीचा उपयोग कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले.

राज्यस्तरीय खो-खो पंच श्री. समीर काबदुले यांनी आपल्या आयुष्यामध्ये खेळाचे महत्व, खेळातील आपला सहभाग कसा वाढविला पाहिजे, करिअर म्हणून पहाताना कोणत्या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे याबद्दल मार्गदर्शन केले.

संस्थेची एक विद्यार्थी कार्यकर्ती आपला परिचय मुलींना करून देताना.

मार्गदर्शनाविषयी आपली प्रतिक्रिया देताना विद्यार्थिनी.

मार्गदर्शनाविषयी आपल्या प्रतिक्रिया लिहून देताना विद्यार्थिनी.
