कानरकोन्ड आंबेड बुद्रुक, तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथील प्राथमिक शिक्षक बंधू यांच्या सहकार्याने शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्या अतीव इच्छा शक्तीतून सन्मानीय सरपंच व उपसरपंच यांच्या खास उपस्थितीत अतिशय उत्तम कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले. स्नेहसमृद्धी मंडळ या सामाजिक संस्थेच्या कार्याचा गौरव व त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना केलेल्या आर्थिक सहकार्याबद्दलचा आभार प्रदर्शन सोहळा, संस्थेच्या आजवरच्या कष्टाचे अगदी चीज झाल्याची भावना आम्हा कार्यकर्त्यांमद्धे जाणवत होती.

कानर गुरुजींनी आम्हाला खास निमंत्रण दिले. सरप्राईज आहे पण तुम्ही सर्व ….. या दिवशी नक्की या.

आम्ही ठरल्याप्रमाणे स्नेह समृद्धी मंडळाचे अध्यक्ष, सचिव, महिला कार्यक्रम अधिकारी, उत्पादन केंद्राचे समन्वयक असे सर्व शाळेत पोहोचलो. अगदी अनपेक्षितपणे समोर शिक्षक पालक संघाची मिटिंग समाप्त होता होता आमचे स्वागत करण्यात आले. पाठोपाठ सरपंच, उपसरपंच, निवडक ग्रामस्थ या सर्वांचेही यथोचित स्वागत होऊन पुढील कार्यक्रम हा स्नेह समृद्धी या संस्थेच्या आजवरच्या कार्याचा गौरव करण्याचा असल्याचे बोलण्यात आले.

संस्थेला आभार पत्र देऊन, संस्थेचे अध्यक्ष, सचिव व कार्यक्रम अधिकारी यांचे शाल व श्री फळ देऊन सत्कार करण्यात आला. आम्ही सर्वच एकदम भारावून गेलो. केवळ आमचा गौरव म्हणूनच नव्हे तर अशा प्रकारचे कामाचे कौतुक करण्याचा मोठेपणा या मंडळींकडे आहे.

दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठी संस्थेने केलेल्या मदतीचा त्यांना खूप आनंद आहे. अगदि आड गाव असूनही तिथं पर्यंत पोहोचून आमच्या गावातील मुलींना आर्थिक मदत केल्याबद्दल ते खूप समाधानी आहेत.

अनेक वेळा आपण ऐकतो, मुलींना पुढे जायला प्रोत्साहन दिलं जात नाही, विशेषतः ग्रामीण भागात पण इथे उलट पहायला मिळालं. सर्व ग्रामस्थ, शिक्षक वर्गाचे मनापासून आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *