शालेय विद्यार्थी प्रकल्प अगदी योग्य लाभार्थी पर्यंत पोहोचविण्यासाठी स्नेह समृद्धी मंडळ संस्थेचे कार्यकर्ते यशस्वी झाल्याची पावती नुकत्याच झालेल्या आंबेड बुद्रुक गावातील कानरकोंड येथील कार्यक्रमात मिळाली. यासाठी सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.

संस्थेचा हेतू ग्रामीण मुलींच्या शिक्षणाच्या प्रगतीला हातभार लावण्याचा आहे. यासाठी संस्थेला मदतीचा हात देणाऱ्या आमच्या दानशूर व्यक्ती आणि संस्थांचे मनापासून आभार.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने अर्थ सहाय्य झालेल्या मुलींनी आपली मनोगते व्यक्त केली. पालकही भारावून गेले होते. आपले कार्य योग्य दिशेने जात आहे. असेच अनेक हात या कामी पुढे आले तर अजुन गरजू मुलामुलींना स्नेह समृद्धी मंडळ मदत करू शकणार आहे.

याच कार्यक्रमामध्ये शासकीय अधिकारी यांनी नजीकच्या गावातील एका गरजू विद्यार्थिनीचा पण संस्थेने विचार करावा असे सुचविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *