स्नेह समृद्धी मंडळ आणि प्रेरणा संस्था,मुंबई यांच्या सहयोगाने दिनांक – २४ व २५ मार्च २०२३ रोजी देवरुख येथील नक्षत्र हॉल मध्ये महिला व बाल हक्क संदर्भात असलेले कायदे ,अधिकार,मुलांच्या संरक्षणाचे महत्व इ.बाबतची सविस्तर अशी माहिती व मार्गदर्शन रत्नागिरी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी सेविका ,बचतगट सदस्य ,प्रभाग संघाचे प्रतिनिधी यांना या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम अतिशय नियोजन पद्धतीने संपन्न झाले.३० वर्षे अनुभव असलेले तसेच आतंरराष्ट्रीय स्तरांवरील प्रशिक्षक डॉ.प्रवीण पाटकर व सौ.प्रीती पाटकर यांनी या संपूर्ण प्रशिक्षणाची रूपरेषा ठरवून स्वतः प्रमुख मार्गदर्शकांची बजावत दोघेही आपल्या ज्ञान व अनुभवाच्या माध्यमातून या विषयांचे समग्र असे मार्गदर्शन उपस्थित प्रशिक्षणार्थीना दिले.

चाईल्ड वेलफेअर कमिटी रत्नागिरीचे सन्माननीय सदस्य श्री.शिरीष दामले आणि चिपळूण येथील भारतीय सेवा केंद्राचे कार्यकर्ते श्री.राजकुमार ससपडे यांनी मुलांच्या बाबतचे महत्वाचे कायदे व कार्यपद्धती तसेच मूल दत्तक घेताना नियम व अटी व माहिती याबाबतचे सविस्तर असे मार्गदर्शन केले. या नंतर पुढे आपण कशा पद्धतीने समाजातील सर्व स्तरातील मुलांसाठी,त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने कसा विचार करावा,ग्रामपंचायत,प्रभाग संघ,अंगणवाडी सेविका, शाळा,संस्था संघटना या सर्वांनीच कसं योगदान देता येईल व कोणी पुढाकार घ्यावा ,यामध्ये परस्पर सहकार्य कसं घेता येईल या बद्दल स्नेह समृद्धी मंडळाच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा सौ.श्रद्धा देशपांडे यांनी मांडणी केली.

निवडक प्रतिनिधींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना मांडले कि,यामध्ये बाल संरक्षण कायदे , काम करताना जाणवणाऱ्या अडचणी कशा सोडवता येतील हे समजले, हि संधी किती महत्वाची होती याची जाणीव झाली. अशा अर्थाच्या प्रतिक्रिया होत्या. प्रत्यक्ष भोजनाच्या वेळी अनेक महिलांनी प्रशिक्षण छान व महत्वाचा होता या भावना व्यक्त केल्या.उपयुक्त प्रशिक्षण वाचन साहित्य हि सर्वाना देण्यात आले.

आपण सर्व या पुढील काळात अतिशय महत्वाचं काम करणार आहोत. शाश्वत विकास या SDG मधील एका प्रमुख उपक्रमात सहभागी होऊन बाल स्नेही ग्रामपंचायत करण्यासाठी महत्वाचे योगदान देणार आहोत. यासाठी अंगणवाडी सेविका,बचतगट,ग्रामसंघ,प्रभाग संघ,सरपंच,सदस्य,स्वयंसेवी संस्था,पोलीस प्रतिनिधी,शिक्षण विभाग,आरोग्य विभाग प्रतिनिधी,असे आपण सर्व जण एकत्र येऊन शाश्वत विकास मध्ये सहभागी होऊन सहकार्य करू ,बालकांचे संरक्षण करू,यासाठी पुन्हा जून २०२३ मध्ये आपण सर्व एकत्र भेटू असे प्रीती मॅडम व श्रद्धा मॅडम यांनी व्यक्त केले.
उत्तम प्रतिक्रिया देऊन सर्व प्रशिक्षणार्थीनी आपला सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *