समसाजातील सध्याच्या बदलत्या वातावरणाला अनुसरुन संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या ज्या बदलाची आवश्यकता आहे त्याप्रमाणे कार्यक्रमांची बांधणी करण्याचे काम संस्थेमार्फत सुरु आहे. महिला, तिचे कुटुंब, विशेषत: किशोरवयीन मुलं मुली यांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य दिशा देण्याच्या प्रयत्नामधून युवतीगटांची स्थापना करण्यात आली आहे. प्रकल्प विद्या अंतर्गत करण्यात येणाऱ्या शैक्षणिक आर्थिक मदत असो किंवा विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत असलेले कुटुंबजिवनशिक्षण, क्रिडाविषयक, करिअर विषयक आणि आरोग्यविषयक प्रशिक्षण कार्यक्रम असोत महिलांचा सर्वांगिण विकास” या धेय्याला अनुसरुनच पण निडबेस कामाची सुरुवात सध्या संस्थेमार्फत करण्यात आली आहे.

गावागावांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या युवतीगटांमध्ये इतर सर्व प्रकारच्या मार्गदर्शनाबरोबरच कौशल्यविकास मार्गदर्शनावर भर देण्यात आला आहे. यामध्ये, अन्न व फळ प्रकिया प्रशिक्षणातुन विविध खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम सध्या युवतीगटांमध्ये सुरु आहेत. सुकी भेळ, ओली भेळ, पाणीपूरी , पॅटीस, बटाटे बडे इ. सारखे रुचकर खाद्यपदार्थ बाहेरुन विकत न घेता घरगुती पध्दतीने बनविले तर ते आरोग्यासाठी चांगले असतात व कमी खर्चामध्ये बनविता येतात हे मुलींना शिकविले जात आहे. ज्यामध्ये मुली अतिशय उर्त्स्फुतपणे सहभागी होत आहेत. सध्याच्या जगात वावरताना केवळ पूस्तकी ज्ञानावर अवलंबून न रहाता व्यवसायाभिमुख शिक्षण मिळणे आवश्यक आहे. रोजच्या आयुष्यामध्ये जगण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींसाठी मुलींना आत्मानिर्भर होणे गरजेचे आहे. मुलींना नोकरी, करिअर सांभाळून घर गृहस्थीसुध्दा व्यावस्थित सांभाळता आली पाहिजे यावर भर देण्यात येत आहे. या वयामध्ये काहीतरी नवीन शिकण्याची जी नैसर्गिकरित्या आवड असते त्याला अनुसरुन अशा प्रकारच्या प्रशिक्षणांचे नियोजन संस्थेमार्फत करण्यात आलेले आहे.

स्नेह समृध्दी मंडळच्या जेष्ठ कार्यकर्त्या मा.सुनिता माईन यांच्यामार्फत दि. २५/०२/२०२६ रेाजी धामापूर सप्रेवाडी मधील युवती गटाला Àचिकन बिर्याणी” बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये गटातील मुलींनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला आणि अतिशय उत्तम प्रकारे चिकन बिर्याणी बनविली. केवळ मोबाईलमध्ये अडकून न बसता एकत्र येऊन आपल्या जिवनोपयोगी गोष्टी ऐकणे, शिकणे यांवर भर दिला गेल्याने काही अंशी तरी या युवक युवतींच्या भविष्यात याचा नक्कीच चांगला परिणाम दिसून येईल याची संस्थेला खात्री वाटते.

