“समर्था” प्रकल्पा अंतर्गत मुलीं सोबत सुसंवाद या स्नेह समृद्धी संस्थेच्या उपक्रमात संस्था कार्यक्षेत्रातील गावांमध्ये विशेष बैठका व प्रशिक्षण कार्यक्रम राबवित आहे. यामध्ये युवतींकरिता कुटुंबजीवन शिक्षण, आरोग्य , क्रीडा , करियर अशा प्रकारचे अनेक विषय घेऊन त्याद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे . युवतींना त्यांच्या दैनंदिन जीवनात व भावी आयुष्यामध्ये काय करावं? योग्य काय अयोग्य काय? आपल्याला शैक्षणिक व कला कौशल्याबाबत कोणत्या संधी आहेत व त्या आपण कधी व कोणत्या पद्धतीने मिळवू शकतो? कौटुंबिक शिक्षणाचे महत्व ,भावी पिढी म्हणून चांगल्या वर्तुणुकीचे महत्व, ग्रामीण भागात राहून ही आपल्या शिक्षण, नोकरी ववैवाहिक आयुष्यात कशा पद्धतीने यशस्वी होता येवू शकते याबाबत संस्थेमार्फत मार्गदर्शन करण्यात येते.

मुलींच्या, महिलांच्या वाढत्या अत्याचाराला प्रतिबंध करणाच्या दृष्टीने मुलींना विद्यालयीन स्तरावर स्व-संरक्षणात्मक शिबीर घ्यावं असा विचार शासकीय स्तरावर झाला. मुंबई विद्यापीठाशी जोडलेल्या महाविद्यालयामद्धे हे शिबीर घेण्याचे ठरले. या नियोजनात भारतीय स्त्री शक्ती एक महत्वाचा घटक होता. त्यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष, सचिव, व कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले. यामध्ये, १६ ते १८ वयोगातील पुढील युवतींना स्व संरक्षणाबाबत मार्गदर्शन करून स्व संरक्षणाची प्रात्यक्षिकं दाखविणे, युवतींनी आयुष्याच्या वाटेवर चालताना या निमुळत्या वळणावर कशाप्रकारे चालणे आवश्यक आहे? या वळणावर कोणकोणते धोके संभवतात ? त्यांना पार करून स्वतःचे तसेच समाजाचे हित जपणासाठी कोणती काळजी घेणे गरजेचे आहे ? काही कारणांनी अति प्रसंगाला सामोरे जावे लागले तर कशा प्रकारे स्वतःचे स्वतःच संरक्षण करता येणे आवश्यक आहे? याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

भारतीय स्त्री शक्तीच्या वतीने स्नेह समृद्धी मंडळ संस्थेने नियोजनामध्ये सहभाग घेतला. संगमेश्वर तालुक्यातील नियोजनाची पहिली बैठक संस्थेच्या कार्यालयामध्ये झाली. यामध्ये महिला बाल कल्याण विभाग, संरक्षण अधिकारी, पोलीस स्टेशन या सर्वांचा सहभाग होता. शिबिराबाबत पूर्वकल्पना देऊन याकरिता इतर परिसरातील कॉलेजच्या मुलींना सहभागी करून घेणे, शासकीय पातळीवर आवश्यक पत्रव्यवहार म. बा. विभागातून करणे. कॉलेजमध्ये जागा आणि उपस्तिथीयांची व्यवस्था संबंधीत शिक्षक करतील बाबत चर्चा झाली. त्यानंतर आठल्ये सप्रे महाविद्यालयाचे अध्यक्ष, प्राचार्य व उपप्राचार्य यांची भेट घेऊन नियोजनासंबंधी कार्यक्रमाचा हेतू, अपेक्षित साध्य याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
राजमाता जिजाऊ युवती स्व संरक्षण प्रिशक्षण शिबीर कार्यक्रमासाठी श्री.लहू पगडे-संरक्षण अधिकारी महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन, श्रीमती जान्हवी कांगणे-पोलीस विभाग सायबर क्राईम, श्रीमती वंदना यादव-प्रकल्प अधिकारी म. बा.क. विभाग (ICDS) पं. सं.संगमेश्वर, श्रीमती उषा पवार-पर्यवेक्षीका ICDS विभाग, श्रीमती नेहा जोशी- उपाध्यक्ष देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ, सौ.नयन शिंदे-भारतीय स्त्री शक्ती देवरुख प्रतिनिधी – स्नेह समृद्धी मंडळ संस्था या मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले.
राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण शिबिराच्या माध्यमातून स्वसंरक्षण, त्याची गरज आणि प्रात्यिक्षिक असे दोन्ही विषयांचे मार्गदर्शन युवतीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. नेहमी सतर्क रहा. सुरक्षित रहा. असा संदेश युवतींना देण्यात आला. आपल्या संस्थेच्या महिला कार्यक्रम अधिकारी सौ.नयन शिंदे यांनी युवतींना स्व संरक्षणची गरज आणि त्याबाबत माहिती घेण्याचे महत्व पटवून सांगितले. संस्थेमध्ये सुरु केलेल्या युवतींच्या कामाबाबतही त्यांनी मांडणी केली. कधीही आवश्यक वाटल्यास संस्थेशी संपर्क करण्याबाबत युवतींना सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *