संस्थेच्या कार्यक्षेत्रामधील कुटुंबं हि शेतकरी व आर्थिकदृष्ट्या गरजू असल्यामुळे अन्न, वस्त्र व निवारा या मुलभूत गरजा भागविणेसुद्धा त्यांच्यासाठी जिकिरीचे असते. अशा परिस्थितीमद्धे आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या अन्य गोष्टी पालक आपल्या मुलांना पुरवतील कि नाही याबद्दल साशंक असणे सहाजिकच आहे. मुलगी वयात आल्यावर तिच्यासाठी अत्यंत गरजेची असणारी व आरोग्याच्या दृष्टीने निकडीची वस्तू म्हणजे मासिक पाळीमद्धे वापरण्यात येणारा सॅनिटरी नॅपकिन. आजही याबाबत उदबोधन होऊनही या सर्वच कुटुंबांमधील मुलींना सॅनिटरी नॅपकिन घेणे आर्थिकदृष्ट्या परवडते असे नाही. परंतु शासनाच्या योजनांमधून अंगणवाडी सेविकांच्या मार्फत किंवा शाळांमधून त्यांना याचा काही प्रमाणात पुरवठा होत असतो. काही शाळांमद्धे सॅनिटरी नॅपकिनसाठी तरतूद नसल्याने शिक्षक स्वखर्चाने ते उपलब्ध करतात.

आपल्या संस्थेमार्फत अनेक उपक्रम राबविले जातात. त्यापैकी समर्था प्रकल्पाअंतर्गत गेले वर्षभरामद्धे १३ ते २१ वयोगटातील मुलींना विविध आवश्यक विषयांवर मार्गदर्शन केले जाते. यामद्धे शाळा आणि शाळाबाह्य मुलींचाही समावेश आहे. या कार्यक्रमासाठी विविध माध्यमिक शाळांचे विशेष सहकार्य संस्थेला झाले आहे. यामद्धे प्रामुख्याने वांझोळे, वाशी, कोसुम्ब, ताम्हाने यांचा सहभाग आहे. सॉफ्ट द नेक्स्ट, पुणे या कंपनीच्या माध्यमातून संस्थेने सॅनिटरी नॅपकिनची मागणी करून या शाळांमधील मुलींकरिता सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले. शाळेतील आरोग्य विभागात हे ठेवल्याने मुलींना त्यांच्या गरजेनुसार मोफत उपलब्ध होऊ शकतात. त्याचप्रमाणे गावांमद्धे घेण्यात येत असलेल्या बैठकांमधील मुलींनाही संस्थेमार्फत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. यासाठी पालक व शिक्षक यांनी संस्थेचे विशेष आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *