गावांमध्ये घडत असलेल्या अनेक वाईट घटनांचा, वादविवादांचा परिणाम गावातील लोकांवर होत असतो. त्यामधून मतभेद वाढत जाऊन कोर्ट कचेऱ्यांच्या तारखा मागे लागतात आणि सहाजिकच व्यक्ती/कुटूंब याच्या विळख्यात वर्षानुवर्षे अडकतात. त्यामुळे मानसिक, शारिरीक तसेच आर्थिक असंतोष निर्माण होऊन गावातील, कुटूंबातील स्वास्थ्य बिघडते आणि गावामद्धे अशांतता निर्माण होते.
कार्यक्षेत्रामध्ये महिलांची गरज म्हणून त्यांच्या कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठी सन २००५/६ पासून संस्थेमद्धे राज्य महिला आयोग महाराष्ट्र शासनाचे संगमेश्वर तालुक्याचे समुपदेशन केंद्र सुरु करण्यात आले. याच्या माध्यमातून तळागाळामद्धे पोहोचण्याची संधी संस्थेला मिळाली. महिलांशी संवाद १९९३ पासून सुरु झाल्यामुळे कौटुंबिक काही अडचण आली तर महिला संस्थेच्या लोकांना विश्वासाने सांगू लागल्या. यांमधून कुटुंबांमद्धे छोट्या मोठ्या कारणांनी होणारे वादविवाद आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या या प्रकर्षाने जाणवू लागल्या अतिशय किरकोळ कारणामुळे पतीचे घर सोडून आलेली महिला हि कायमस्वरूपी माहेरीच राही. त्या महिलेच्या वादाच्या समस्येकडे लक्ष दिले जात नसे. त्यामुळे कौटुंबिक कलह वाढत जावून त्याचा परिणाम संसार तुटण्यामद्धे होत असे. काही केसेस संस्थेच्या माध्यमातून सोडविण्यात आल्या. ज्यांचे संसार भविष्यामद्धे खुप चांगले सुरु आहे.
संस्थेमार्फत स्विस-एड पुणे संचलित, चेतना विकास संस्था पुणे यांच्या सहकार्याने कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा – २००५ या कायद्याबाबत जागृती अभियान २००९ ते २०१३ या कालावधीमद्धे राबविण्यात आले. त्यानंतर २०१५ ते २०१८ स्विस-एड पुणे व हेरिटेज संस्था लांजा आणि शासकीय यंत्रणा यांच्या सहयोगाने कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा – २००५ प्रचार व प्रसार अभियान राबविण्यात आले. स्विस-एड सारख्या संस्थेच्या मदतीने गावागावातील प्रमुख व्यक्ती, कुटूंबे यांच्या पर्यंत स्त्रियांना संरक्षण देणारे कायद्यांचे महत्व सांगता आले. जनजागृती, जनता व कायदेविषयक सेवाभावी यंत्रणा यांच्यामद्धे समन्वय निर्माण झाला. गावांमद्धे आधारगटाची रचना तयार झाली. स्त्रिया आपल्या गटांच्या पातळीवरच नाही तर गाव पातळीवर कौटुंबिक कलह होऊ नयेत म्हणून प्रयत्न करू लागल्या. त्याचबरोबर संस्थेच्या अशा प्रयत्नांमुळे गावातील पोलीस पाटील असो पोलीस स्टेशन असो व न्यायालयीन उपक्रम असो स्नेह समृद्धी संस्थेच्या माध्यमातून सहकार्य मिळते याबद्दल एक विश्वास निर्माण झाला.
गावागावांमध्ये स्थापन केलेले आधारगट कार्यक्रम संपल्यावरही तसेच चालू ठेवण्याची मोठी जबाबदारी संस्थेच्या कार्यकर्त्यांवर होती. संस्थेचे कार्यकर्ते आजही गावांमद्धे जाऊन याबद्दल माहिती देतात. गावात घडणाऱ्या विविध घडामोडींचा आढावा घेतात. आधारगटांना त्यांच्या जबाबदारींची आठवण करून देतात. आमच्या अनुभवी व लोकांमद्धे एकरूप होऊन अतिशय प्रामाणिकपणे व तळमळीने काम करणाऱ्या, स्विस-एड पुणे यांच्या सोबत काम करीत असताना संस्थेच्या समुपदेशक म्हणून ज्यांना आय. एल. एस. लॉ कॉलेज पुणे यांच्या मार्फत समुपदेशकाचे प्रशिक्षण पुर्ण करता आले. व समुपदेशकाची पहाणी व निरीक्षण करणेकरीता लॉ कॉलेजच्या प्रतिनिधी म्हणून काम करण्याची ज्यांना संधी मिळाली अशा आमच्या हाडाच्या कार्यकर्त्या सौ. सुनीता माईन गावांमद्धे जाऊन आधारगटांसोबत बैठका घेतात, त्यांच्या कामांचा आढावा घेतात व गरज वाटेल तेथे स्वतः लोकांचे समुपदेशन करीत आहेत. जेणेकरून लोकांमद्धे होणारे वाद गावातच संपुष्टात येण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. कोर्ट कचेऱ्यांपर्यंत लोकांना जावे लागणार नाही. आणि गावांतील विषय गावांमद्धेच सोडविले जातील जेणेकरून समाजात शांतता टिकुन रहाण्यास मदत होईल. गावांमद्धे जाऊन हे काम करीत असताना लोकांचा चांगला प्रतिसाद (Support) कार्यकर्त्यांना मिळत असल्याने काम करताना त्याचा नक्कीच उपयोग होत आहे.


संस्थेच्या अध्यक्ष व कार्यकर्ते यांचे कौटुंबिक सल्ला आणि आधार गटांना मार्गदर्शन
