स्नेह समृद्धी मंडळ संस्थेच्या प्रकल्प समर्था अंतर्गत सुरु असलेल्या बैठकांना गावांमधून मुलींचा खुप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. संस्था “महिलांचा सर्वांगीण विकास” या ध्येयाला अनुसरून काम करीत असताना मुलींचा आत्मविश्वास वाढावा, मुलींनी त्यांच्या भावी आयुष्यामद्धे प्रगती करावी, सर्व कलागुणांमद्धे त्यांनी निपुण व्हावे, स्वतःचे संरक्षण त्यांनी स्वतः करावे यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरु आहेत. त्याकरीता अनेक कार्यक्रमांमद्धे मुलींना सहभागी करून घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मुलींना कुटुंबामद्धे अत्यंत आवश्यक असणारा विषय म्हणजे स्वयंपाक बनविणे किंवा विविध खाद्यपदार्थ बनविणे. मुलींना स्वयंपाकाची आणि विविध खाद्यपदार्थ बनविण्याची आवड निर्माण व्हावी जेणेकरून त्याचा फायदा त्यांच्या भावी आयुष्यात चांगल्या प्रकारे होऊ शकेल याकरिता गावांमद्धे सध्या सुरु असलेल्या युवतींच्या बैठकांमद्धे अशा प्रकारचे खाद्यपदार्थ किंवा छोट्या भुकेचा नाश्ता बनविण्यासाठीचे मार्गदर्शन संस्थेच्या कार्यकर्त्या व समुपदेशक सुनीता माईन यांच्याकडून देण्यात येत आहे.

मुलींना यामुळे काही पदार्थ बनविण्याची आवड निर्माण होत आहे. तसेच कंटाळा न करता बैठकांना उपस्थित राहून बैठकांमद्धे होणारे विषय त्यांच्यापर्यंत पोहोचविणे संस्थेला अधिक सोपे होत आहे. संस्था प्रकल्प “समर्था ” अंतर्गत मुलींच्या बैठकांचे संपूर्ण वर्षाचे नियोजन करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *