कोकणवासीयांचा सर्वात आवडीचा सण म्हणजे गणेशोत्सव. मुख्यतः या सणासाठी सर्वच कोकणवासीय मोठ्या उत्साहात आणि आनंदात एकत्र येऊन गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात. यावर्षीही अतिशय जल्लोषात गणेशोत्सव साजरा झाला.
देवरुख होम प्रॉडक्ट्स प्रा. लि. या आपल्या कंपनी मध्ये तयार केलेल्या खाद्यपदार्थांना गणेशोत्सवामद्धे खाद्यपींचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. या गणेशोत्सवानिमित्त काजूमोदक, चकली, आणि चार प्रकारचे लाडू हि नवीन उत्पादने करण्याचा प्रयत्न (Trial )करण्यात आला. यांचे नमुने (Sample) कंपनीचे हितचिंतक तसेच ग्राहकांना देण्यात आले. त्यांचा काय प्रतिसाद येईल याच्या प्रतीक्षेत असतानाच कंपनीचे काजू मोदक, चकली आणि सर्वच लाडू अतिशय चविष्ट आणि क्वालिटी एक नंबर झाली आहे असे सर्वांचे उत्तर (Reply) आले आणि ऑर्डर यायला सुरुवात झाली. विक्री करण्यात आलेले काजू मोदक ग्राहकांच्या पसंतीला उतरले आणि अनपेक्षितपणे ५००० नग काजू मोदकांचे उत्पादन व विक्री यावर्षी करण्यात आली. लोकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद या उत्पादनाला मिळाला. काजू मोदकांसोबतच २८ किलो चकली, रवा लाडू , बेसन लाडू, मेथी लाडू, पौष्टिक लाडू अशा प्रकारचे सर्व लाडू मिळून ७५० नगांची विक्री करण्यात आली. त्याचबरोबर पापड, लोणची, चटण्या, पीठे या सर्वच उत्पादनांची चांगली खरेदी चाकरमानी आणि मुंबई व्यतिरिक्त इतर ठिकाणांहून आलेल्या ग्राहकांकडून करण्यात आली.
“महिलांचा सर्वांगीण विकास” या ध्येयाने स्नेह समृद्धी मंडळ संस्थेने सुरु केलेले सामाजिक कार्य आज यानिमित्ताने फळाला येताना दिसते आहे. ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी मिळावी, त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, त्यांनी आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हावे आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबालाही याचा फायदा व्हावा या हेतुने सुरु केलेले “समृद्धी पापड युनिट” सध्या देवरुख होम प्रॉडक्ट्स प्रा. लि. या नावाने ओळखले जाते आहे. या युनिटमद्धे ५ ते ६ प्रकारचे पापड, लोणची, पीठे, दिवाळीचे सर्व खाद्यपदार्थ, काजू मोदक अशा प्रकारची उत्पादने घेण्यात येतात. बचतगटांतील महिला स्वतः ही उत्पादने तयार करतात . वैयक्तिक ग्राहक, दुकानदार, हॉटेल्स शिवाय पुणे, मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी इ. शहरांमद्धे भरविण्यात येणारी प्रदर्शने, गावागावांमद्धे होणाऱ्या यात्रा यांसारख्या ठिकाणी जाऊन महिला या उत्पादनांची विक्री गेली अनेक वर्षे करीत आहेत.
यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये उत्पादनांना विशेषतः काजू मोदक, चकली, आणि सर्व प्रकारचे लाडू या उत्पादनांना ग्राहकांच्या मिळालेल्या चांगल्या मागणीमुळे विक्रीमद्धे वाढ झाली आहे. महिलांना रोजगार मिळून केवळ एक ते दोन आठवड्यात रु.१२०००/- एवढी मजुरी प्राप्त झाली आहे. यासाठी कंपनीतील सदस्यांना उत्पादन आणि विक्रीकरिता संस्थेच्या कार्यकर्त्यांनीही शक्य होईल त्याप्रमाणे मदत केली आहे. यामुळे सर्वांमद्धे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आणि काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. अनेक वर्षे घेण्यात येत असलेल्या मेहनतीमुळे भविष्य उज्वल होण्याचे संकेत यानिमित्ताने दिसत आहेत.

