स्नेह समृध्दी मंडळ संस्थेमार्फत दिनांक २९/०१/२०२६ ते ३०/०१/२०२६ दोन दिवस किशोरवयीन मुलं मुली, युवती यांच्यासोबत संस्थेच्या अध्यक्षा मा.श्रध्दा देशपांडे यांच्या उपस्थितीत बैठक व चर्चा घेण्यात आल्या. यामध्ये मानसकोंड, धामापूर, वांझोळे, मोड येथील मुलांचा सहभाग होता. प्रमुख विषय करिअरविषयक मार्गदर्शन व कौटुंबिक जबाबदारी हा होता.

कार्यक्षेत्रात यापुर्वी संस्थेने महिलांचा सर्वांगिण विकास पर्यायाने कुटुंबाचा विकास होईल असे विविध कार्यक्रम, उपक्रम घेतले. कालांतराने जे समाजामध्ये, यंत्राणांमध्ये बदल होतात त्यानुसार गावामध्ये येणाऱ्या योजना आणि महिला समुह हे शासनाला जोडले गेले. गरजेनुसार महिलांना आवश्यक मार्गदर्शन देण्यासाठी संस्थेचे समुपदेशन केंद्र सेवा देत आहे. पण सध्याच्या काळामध्ये किशोरींना योग्य वयात आवश्यक मार्गदर्शन मिळाले तर पुढे त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक घटनांना, प्रसंगाना सामोरे जाऊन स्वतःच करिअर घडवू शकतात. म्हणूनच या वयोगटातील मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. सध्याच्या काळामध्ये समाजात वावरताना मुलांना योग्य शिक्षण, विविध कौशल्य, स्वतःमधील गुण दोष ओळखणे त्याबाबत विचार करुनच स्वतःचा वावर असावा, यासाठी मानसिक तयारी असावी, विविध कौशल्य आत्मसाद करावीत, विविध क्षेत्राची माहिती करुन घ्यावी, प्रशिक्षण बरोबरच हे आवश्यक आहे. आपले ध्येय्य निश्चित करुन त्यानुसार पुढे जाण्यासाठी शिक्षक, पालक आणि परिसरातील अनुभवी लोक यांचे सहकार्य घ्यावे. स्वतःमध्ये आत्मविश्वास असायला हवा म्हणजे मी कोण? आपली केशभुषा, वेशभुषा, वर्तन कसे आहे याकडेही लक्ष असणे महत्वाचे आहे. कुणाकडूनही आपली आणि आपल्या बरोबरच्यांचीही फसवणुक होणार नाही यासाठी मित्र मैत्रिणी यांच्याशी बोलताना, वागताना काही वेगळं वळण (संशयास्पद) असेल तर त्यावर मोठयांशी बोलणे आवश्याक असल्याचे मा. देशपांडे यांनी सांगितले. पालक (कुटुंब) हे आपलं सुरक्षाकवच आहे, त्यांच्याशी आपला योग्या संवाद असणे अतिशय महत्वाचे आहे असे मत त्यांनी मांडले.

मला काय व्हायचं आहे? साधारण खेडेगावात १० वी, १२ वी नंतर काहीतरी पैसे कमवायला मुलं बाहेर पडतात. कुटुंबाला हातभार लावावा किंवा मोबाईल इ. काही हौस मौज, मित्र परिवार यांच्यासोबत खर्च करावा असं काही असतं. मात्र प्रत्यक्षात या वयात असा विचार हवा की, मी माझ्या आयुष्यात कोण होणार आहे. माझे गुण दोष काय आहेत, त्यानुसार मला वाटचाल करायला हवी. चांगल्या वाईट गोष्टी ओळखायला शिकलं पाहिजे. अल्लड वयामध्ये जे नैसर्गिक बदल होतात त्यानुसार संस्कार व शिष्टाचार राखायला हवेत. एखादी चूक या वयातील आयुष्य संपवू शकते. आपल्या एका चुकीच्या पाऊलामुळे आपल्यावर शारिरीक, मानसिक दुष्पापरिणाम होतात शिवाय कुटुंबामध्येही यांमुळे वाईट परिणाम होत असतात.

उद्याचे जबाबदार नागरिक, व्यक्ती होण्यासाठी आतापासूनच सुरुवात करणे गरजेचे आहे. सेवा उद्योग, उद्योगधंदे, नोकरी, शेती इ. सारखी अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या कौशल्यानुसार विषयाची निवड करुन पुढे शिक्षण घेतले, कष्ट घेतले तर योग्य फळ नक्कीच मिळणार असते. अनेक मार्गदर्शक आपल्या बरोबर आहेत. वर्गशिक्षक आणि प्रमुख म्हणजे आपलं कुटुंब यांना बरोबर घेऊन बुध्दीला कष्टाची जोड दिली तर तुमचे भविष्य उज्वाल आहे. मात्र डोक्यात फक्त हवा जायला नको यासाठी अनुभव म्हणून तरुणांनी थोडे दिवस कोणत्याही शहरात जाऊनही अनुभव घ्यायला हवेत म्हणजे कौटुंबिक, सामाजिक जबाबदारी घेताना हा अनुभव गाठीशी असेल, संस्थेच्या प्रकल्प “विद्या” अंतर्गत विद्यार्थ्यांना होत असलेल्या शैक्षणिक सहाय्याचे दुसऱ्या टप्यातील धनादेशाचे वाटप यावेळी करण्यात आले. “श्रीमती हळबे” यांच्या मार्फत देण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती लाभार्थी
विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या शिक्षक, पालकांची विशेष भेट घेण्यात आली व त्यांच्याशी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत आणि आरोग्याबाबत चर्चा करण्यात आले.

संस्थेच्या स्थानिक स्वयंसेवक व सामाजिक कार्यकर्त्या मा. मादुस्कर बाई यांची यावेळी विशेष भेट घेण्यात आली. त्यांच्या प्रकृतीबाबात व गावातील सध्यस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. त्यांना त्यांच्या पुढील आरोग्यासाठी मा. देशपांडे मॅडम यांनी संस्थेच्या वतीने शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे संस्थेच्या अध्यक्षा मा. श्रध्दा देशपांडे मॅडम यांनी संस्थेच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये दौरा दरम्याने अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. याचा निश्चीतच चांगला परिणाम किशोर वयातील मुलं, मुली व पालक यांच्यावर होणार आहे. यावेळी उपस्थित शिक्षक, पालक व इतर प्रतिनिधींनी आपापली मते मांडली. तसेच संस्थेच्या अध्यक्षा मा. श्रध्दा देशपांडे, सचीव मा. सुजाता प्रभुदेसाई, व कार्यकर्ते सौ. सुनिता माईन, सौ. नयन शिंदे व श्री. वैभव गवंडी यांचे त्यांच्यामार्फत मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

KIBRIS ESCORT

Makrobet

makrobet

Makrobet

meritking

makrobet

Makrobet

makrobet